पुन्हा विना अनुदानीत गॅस सिलेंडराच्या मूल्यात सरकारी ऑईल कंपन्यांनी आज तब्बल २५ रूपयांची वाढ केली आहे. पुन्हा एकदा सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिडरच्या किमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने विनाअनुदानित १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केलीय. त्याचबरोबर १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ७५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
१ जानेवारी ते १ सप्टेंबर दरम्यान स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रत्येकी १९० रुपयांची वाढ झाली आहे. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी काढून टाकली. या मासिक वाढीमुळे मे २०२० पर्यंत सबसिडी काढून टाकली गेली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे. घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत १ मार्च २०१४ रोजी ४१०.५ रुपये प्रति सिलेंडर होती.