मालेगाव अपर पोलीस अधीक्षक पदी आयपीएस अधिकारी निलेश तांबे यांच्या नियुक्ती बाबत अनेक चर्चा सुरू होत्या यातच अचानक नव्याने आदेश काढून निलेश तांबे यांची नंदुरबार येथे बदली करण्यात आली.
तर मालेगावच्या अपर पोलीस अधीक्षक पदी अनिकेत भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनिकेत भारती हे भंडारा येथे पोलीस अधीक्षक पदी कार्यरत होते.
शासनाने नव्याने आदेश काढून तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
दरम्यान आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीने मालेगाव शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी मदत होईल अशी मालेगावकरांची अपेक्षा होती.