मालेगाव महानगरपालिका हद्दीत दुकानावरील तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर इंग्रजीत असलेली नावे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित विभागाच्या निदर्शनात येतात त्यांनी मालेगाव महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले व तसेच मराठी पाट्या लावण्याबाबत एक महिन्याची मुदत दिली, अन्यथा एका महिन्यानंतर जर निवेदनाचे अंमलबजावणी झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी मे. न्यायालयात दावा दाखल करू असा अल्टिमेटम देण्यात आला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने सरचिटणीस,अध्यक्ष जनहित कक्ष व विधी विभाग ॲड. किशोर शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष राकेश पेडणेकर, उपाध्यक्ष तुषार आगरकर व चिटणीस मोहनसिंहजी चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मालेगाव मनसे शहराध्यक्ष तथा सहकार सेना जिल्हाध्यक्ष राकेश भामरे व नाशिक जिल्हाअध्यक्ष प्रफुल बनभैरू यांच्या सहकार्याने मालेगाव शहरात मनसे जनहित व विधी विभागाचा श्री गणेशा झाला
त्यावेळी मनसे जनहित विभाग मालेगाव तालुका संघटक पुरुषोत्तम जगताप, शहर संघटक प्रतिक सरोदे, उपसंघटक तुषार चव्हाण, सचिव स्वप्नील बच्छाव, उपसचिव तुषार पाटील, शहर उपसंघटक अक्षय खैरनार, शहर सचिव आशुतोष चंदन, भूषण गवळी आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.