(मालेगाव) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभाग आणि सेवाभावी संस्था सारा फाउंडेशन तर्फे बालदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या बाल दिनाच्या निमित्ताने जे ए टी महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थिनींनी आश्रय संस्कार आणि पुनर्वसन केंद्रास भेट दिली आणि अनाथ बालकांना सदिच्छा भेट देऊन बालदिन साजरा केला. महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार आणि इंग्रजी विभाग प्रमुख आणि सारा फाउंडेशनच्या संचालिका प्रा. मेश्रामकर सुनेत्रा यांच्या समवेत विद्यार्थिनींनी या बालगृहास भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना नेहरूजींचे आवडते गुलाब पुष्प देऊन बाल दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. विद्यार्थिनींनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोगत जाणून घेतले. आश्रय संस्थेचे संस्थापक एडवोकेट शामकांत पाटील आणि शोभाताई जगताप यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी डॉ. सलमा अब्दुल सत्तार आणि प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. मन्ताशा, कु. नुर्रनिसा, कु. आएशा यांच्यासह इंग्रजी विभागाच्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.
जे ए टी महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अनाथ बालकांसमवेत साजरा केला बालदिन.
0