📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

राधिका फाउंडेशन नाशिकच्या वतीने बाल दिनानिमित्त गरीब मुलांना कपडे स्वेटर व मिठाईचे वाटप

नाशिक () बाल दिनाचे औचित्य साधून श्री राधिका फाउंडेशन बहुदेशीय संस्थेने औरंगाबाद रोड वरील झोपडपट्टीत राहणाऱ्या लहान मुलांना कपडे स्वेटर फरसाण केळी चॉकलेट व मोठ्या माणसांना चप्पल व शिल्ड महिलांना ड्रेस व साडी यांचे वाटप करण्यात आले.

थंडीचे दिवस सुरु झाले व येथील लहान मुलांना कपडे व स्वेटर ची आवश्यकता आहे हे लक्षात आले म्हणून फाउंडेशन तर्फे हा उपक्रम राबवला गेला,  संस्थापिका चेतना सेवक यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की या दिवसात आपल्याला आजूबाजूच्या परिसरात जर लहान मुले किंवा वयोवृद्ध असतील ज्यांना थंडीमुळे त्रास होत असेल अशा गोरगरीब नागरिकांना आपापल्या परीने मदत करा.

         यावेळी संस्थापिका चेतना सेवक, अध्यक्षा कल्पना सोनार , सदस्य प्राची राव, राणी कासार, खुशबू सेवक, शुभांगी गुंजाळ, विनोद जैन, गौरव सोनार, डॉ शुभांगी सेवक, राजु सातपुते आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने