📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

म. स. गा. महाविद्यालयात गणित विभागातर्फे पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन

 म.स. गा. महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथील एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स विषयाच्या च्या विद्यार्थ्यांसाठी मॅथेमॅटिक्स इन नेचर व मॅथेमॅटिक्स इन लाईफ या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत सुमारे 30 विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन केले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा. प्राचार्य डाॅ. दिनेश शिरुडे यांनी गणिता शिवाय विज्ञान व जीवन अपूर्ण असल्याचे सांगितले. विभाग प्रमुख प्रा. पी. ए. अहिरे यांनी गणित विषयातील नोकरीच्या संधी विशद केल्या. डॉ. के.एस.अहिरे यांनी गणितातील नवीन संशोधनाबद्दल माहिती दिली. स्पर्धेतील विद्यार्थ्यांना उपप्राचार्य डॉ. सी.एम. निकम यांनी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विभागाचे प्रा.एस. एम. चिंचोले यांनी नुकतीच पीएच.डी. पदवी संपादन केली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा.एस. ए.सांगळे, प्रा. काळे, प्रा. श्रीमती निकम, प्रा. श्रीमती बोरसे, प्रा. श्रीमती समरीन अन्सारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने