MTS अर्थात महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहाचा तंत्र दीपोत्सव डिजिटल दिवाळी अंक वर्षे तिसरे २०२२ दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्याचे डॉ.वसंत काळपांडे आणि शिक्षण उपसंचालक विकास गरड यांच्या प्रमुख उपस्थितीत झूम अँपवर मोठ्या थाटामाटात व उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशित करण्यात आला.तंत्र दीपोत्सव डिजिटल दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ.वसंत काळपांडे सेवानिवृत्त शिक्षण संचालक तसेच चिफ ऑर्गनायझर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या हस्ते तर तंत्र दीपोत्सव दिवाळी अंकाच्या फ्लिपबुकचे प्रकाशन मा.विकास गरड यांच्या हस्ते मोठ्या धूमधडाक्यात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.वसंत काळपांडे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास गरड हे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी झूम ॲपद्वारे महाराष्ट्रातील शिक्षक बंधुभगिनी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते.सर्वप्रथम ऑनलाईन दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली. तद्नंतर अंजली बोरोळे यांच्या मंजूळ अशा आवाजात ईश स्तवन सादर करण्यात आले.स्वागत गीत अंजली बोरोळे आणि मंजुषा जोशी यांनी सुरेख व मंजूळ आवाजात केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.डॉ.वसंत काळपांडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, ई - शिक्षणाचे महत्त्व, आर.टी.ई. ऍक्ट २००९, भाविष्यवेधी शिक्षण, रंजक अध्ययन अध्यापन पद्धती या विषयांवर मार्गदर्शन केले.महाराष्ट्रातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फायदा होईल अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर साधन म्हणून झाला पाहिजे असे प्रतिपादन केले.
विकास गरड यांनी कोरोना काळातील डिजिटल शिक्षणाचे महत्व प्रतिपादन केले.समूहाचे कार्य, सातत्य आणि झालेल्या विस्ताराविषयी कौतुकोद्गार काढले. ई- कंटेंटचा आपल्या वर्गासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त वापर होईल अशी बांधिलकी शिक्षकांनी बाळगावी असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.समूहाचे राज्य समन्वयक सुनीलकुमार बडगुजर-जळगाव यांनी प्रास्ताविक केले.भालचंद्र भोळे-भिवंडी यांनी समूहाची वाटचाल आणि दिशा याबद्दल मनोगत व्यक्त केले.
तंत्र दीपोत्सव डिजिटल दिवाळी अंक २०२२ खुप आकर्षक,वाचनीय आणि विविधरंगी झाला असून वाचकांच्या पसंतीस उतरेल असा झालेला आहे.अंकामध्ये कथा,कविता, शैक्षणिक लेख, तंत्रज्ञान लेख,व्यंगचित्रे,रांगोळी,चित्रे,विविध शैक्षणिक उपक्रम इ.बाबींनी अंक दिमाखदार झाला आहे.
विकास गरड,शिक्षण उपसंचालक SCERT PUNE आणि हेमंत भदाणे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी , धुळे यांनी दीपोत्सव अंकास शुभेच्छा पाठविल्या आहेत.
तंत्रस्नेही दीपोत्सव २०२२ चे संपादकीय काम समूहाचे राज्य समन्वयक भालचंद्र भोळे भिवंडी, शारदा चौधरी -ठाणे, सुनिलकुमार बडगुजर जळगाव, समाधान अहिरे निंबायती नाशिक , संजय राठोड - नांदेड यांनी केले. मुद्रितशोध, अक्षरमांडणी,ग्राफिक्स सदाशिव अत्तरकर बुलढाणा, संजय राठोड नांदेड, अमृतसिंग राजपूत नंदुरबार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समूहाचे प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र गवळी राज्यसमन्वयक महेश पराड,
राणा चौधरी,सुनिल हटवार,
दिपक कोळी,किरण हिवराळे,नरहरी निकाडे , सचिन महाडकर,सुधीर फडके,दत्ता लोकरे,विशाल पाटील,प्रभाकर गढरी, वैशाली सावंत,मंगला अळसपुरे, माधवी नेरकर यांनी सहाय्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समूहाचे राज्य समन्वयक अमृतसिंग राजपुत-नंदुरबार आणि समूहाच्या प्रशासिका सारिका आचमे-नांदेड यांनी केले.तांत्रिक सहाय्य सुनील बडगुजर, मनीषा कोल्हे यांनी केले.कार्यक्रमासाठी महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहाचे सर्व प्रशासक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कल्पना शाह -ठाणे यांनी पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.