📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

30 हजारांची लाच प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्याच्या पीएसआय व पोलीस नाईकास लाचलुचपत विभागाकडून अटक

मालेगाव (मनोहर शेवाळे) मालेगाव येथील आझाद नगर पोलीस स्टेशनचे पीएसआय व पोलीस नाईकास 30 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे

शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांचे लाच  प्रकरण ताजे असतानाच मालेगाव शहरातील पोलिसांनी लाचेची मागणी केली, त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे..

याबाबत सविस्तर वृत्त असे की महिला तक्रारदार वय - २९ वर्ष, रा. मालेगांव, जि. नाशिक यांचे पतीचे पोलीस कस्टडी रिमांड वाढून न घेण्यासाठी तसेच इतर गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी संशयित आरोपी 1) सुनील हिम्मतराव पाडवी , वय - ४० वर्ष, व्यवसाय- नौकरी, पोलीस नाईक, आझाद नगर पोलीस स्टेशन, मालेगांव, जि.नासिक वर्ग-3. २) प्रदीप नवनाथ आव्हाड, वय- ३४ वर्ष, व्यवसाय- नोकरी, सहायक पोलिस निरीक्षक, आझाद नगर पोलीस स्टेशन, मालेगाव, जि.नाशिक. वर्ग- 2. यांनी महिला तक्रारदार हिचेकडे दिनांक 08/08/2021 रोजी 30,000/- ₹. लाचेची मागणी केली तेव्हा, श्री. सुनील कडासने पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक, श्री. निलेश सोनवणे अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, श्री.सतीश भामरे पोलीस उपअधीक्षक वाचक लाप्रवि नाशिक, श्री.नरेंद्र पवार उपअधीक्षक लाप्रवि नाशिक यांच्या मार्गदर्शनाने सापळा अधिकारी श्रीमती साधना इंगळे पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.,नाशिक, सह अधिकारी- श्री.सुनील पाटील पो.उप अधीक्षक ला.प्र.वि.नाशिक, सापळा पथक -दीपक कुशारे, साचिन गोसावी, राजू गीते, शरद हेम्बाडे,संतोष गांगुर्डे, परशराम जाधव सर्व नेमणूक लाप्रवव नाशिक यांनी सापळा रचून संशयित आरोपींना अटक केली. हॅश व्हॅल्यू घेण्यात आले आहेत.आरोपीचे सक्षम अधिकारी- मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे आहेत.

सर्व नागरीकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक
@ टोल फ्रि क्रं. 1064
===================

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने