देवळा (प्रशांत गिरासे) कसमादे परिसरात दिवसेंदिवस अमेरिकन लष्करी अळीचे मका पिकावर आक्रमण वाढत असून अनेक महागडी औषधांची फवारणी करुनही अळी मरत नसल्याने बळीराजाच्या पायाखालची जमीन सरकु लागली आहे.
अमेरिकन लष्करी अळी पडल्याने बळीराजा कमालीचा धास्तावला आहे, हाताशी येणार घास निसर्ग अशाप्रकारे हिरावून घेत आहे,
मराठवाड्यातही मागील तीन वर्षांपासून अमेरिकन लष्करी अळीने चांगलेच जेरीस आणले होते. यामध्ये मकाचे ५० ते ७० टक्क्यांवर नुकसानही झाले. याशिवाय लष्करी अळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊन आजवरच्या इतिहासात कधी नव्हते ते प्रथमच बाजरी पिकावर फवारणी करण्याची वेळ आली होती.
कसमादे परिसरात नुकतीच मका पिकाची पेरणी झाली असून सध्या हे पिक अवघ्या गुडघाभर वाढले आहे तर काही ठिकाणी वीतभर वाढलेले आहे, अशाही अवस्थेत मकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव झाल्याचे चित्र असून किडीची अळी अवस्था पिकांना नुकसान पोहोचते सुरुवातीच्या अवस्थेत अळ्या पानाचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसतात. मोठ्या आळी या पाने कुरतडुन खातात. त्यामुळे पानांची छिद्रे दिसतात. अळी फुग्यांमध्ये शिरून आत खाते. पानांची छिद्रे व पोंग्यमध्ये अळीची विष्ठा ही चिन्हे या अळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे आहेत. या किडींच्या प्रादुर्भावामुळे ३० ते ६० टक्के पर्यंत उत्पन्नात घट होऊ शकते.
एकीकडे डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, या वर्ष कोबी, टमाटे, ह्या पिकांवरचे आथिर्क खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे, अशा अस्माणी सुलतानी संकटातून बळीराजाला जावे लागतं असुन, भाजीपाला व इतर पिकांना योग्य भाव मिळावा अशी शेतकऱ्यांना कडुन अपेक्षा केली जात आहे
दरम्यान, संपूर्ण कसमादे परिसरातील शेतकरी लॉक डाऊन ने आधीच बेजार झाला आहे, इतर दुसरे कोणतेही प्रकारे उत्पन्नाचे साधन नसलेल्या अनेक शेतकऱ्यांचे जीवन अत्यंत हलाखीचे होत चालले आहे, शासनाकडून मिळणाऱ्या अनेक योजनांची माहिती व मदत अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही तसेच मदत ही अत्यंत तुटपुंजी असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे सध्या या लष्करी अळीचा बंदोबस्त करण्याचा आटापिटा शेतकऱ्यांकडून केला जात आहे तरी या प्रकरणी संबंधित अधिकारी, प्रशासनाने नोंद घेऊन त्वरित कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे