मालेगाव (जय योगेश पगारे)
🚨दुष्कृत्य करण्याच्या इराद्याने अपहरण🚨नकार दिल्याने संतापात डोक्यात घातला दगड🚨माणुसकीला काळीमा फासणारी घटना
शहरातील नवा आझाद नगर येथून बेपत्ता असलेल्या 12 वर्षीय मुलाचा मृतदेह जाफर नगर मधील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आढळून आला होता. या मुलाच्या हत्येप्रकरणी संशयित फैजान अख्तर अब्दुल रहेमान (२०), रा. दत्तनगर, मालेगाव याला पोलिसांनी अटक केली आहे.
मुलासोबत दुष्कृत्य करण्याच्या इराद्याने संशयिताने २२ मे रोजी नवा आझादनगर येथील आपल्या मित्रांबरोबर खेळण्यास गेलेल्या अरसलान शेख (१२) याला आपल्या लाल रंगाच्या सायकलवर घेऊन गेला, परंतु दुष्कृत्य करण्यास अरसलानने नकार दिल्याने, संतापात संशयिताने त्याच्या डोक्यात दगड घातला या मोठ्या आघाताने अरसलान जागीच गतप्राण झाला, त्याचा मृतदेह दोन दिवसांनी जाफरनगरमधील शब्बीर हसन मशिदीसमोरील बांधकामाच्या दुसऱ्या मजल्यावर आढळून आला होता. या प्रकरणी आझादनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला
होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी तपासीची सूत्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात अरसलान एका व्यक्तीबरोबर सायकलवर बसून गेल्याचे निदर्शनास आले. त्याआधारे संशयित फैजानला ताब्यात घेण्यात आले. यावेळी संशयित फैजानने खुनाचा गुन्हा कबूल केला.
अरसलान च्या परिवाराने त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार आधीच नोंदवली होती.
याबाबत पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत या प्रकरणाचा छडा लावला याबाबत पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी माहिती दिली. सचिन पाटील यांनी या प्रकरणाचा आढावा घेऊन पोलिसांना तपास प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
पाटलांच्या सूचनेनुसार कार्यवाही करुन तपास अधिकारी सीसीटीव्ही फुटेज गोळा केले, त्यात आवश्यक ती माहिती तपास पथकाला मिळाली. ही माहिती पडताळल्यानंतर पोलिसांनी रेहमानला चौकशीसाठी ताब्यात घेतले व त्यानेच अपहरण करून खून केल्याची कबुली दिली.