मालेगाव (मनोहर शेवाळे )
१०० % रोखीनेच कर्जाचा भरणा करावा, खात्यातील शिल्लक वर्ग करता येणार नाही असे बँकेचे आडमुठे धोरण ,
हंगाम तोंडावर असताना शेतकरी संकटात असताना ती सक्तीची वसुली शेतकऱ्याचे जीवन उद्ध्वस्त करणारी
बँकेच्या एमडी ची शेतकऱ्यांशी अरेरावी
शंभर टक्के कर्ज भरणा हा रोखीनेच केला पाहिजे खात्यातील शिल्लक वर्ग करता येणार नसल्याची बँकेची भूमिका धोरण शेतकऱ्यांची सक्तीने कर्ज वसुली चालू केलेली आहे, हंगाम तोंडावर असताना शेतकरी संकटात असताना ती सक्तीची वसुली शेतकऱ्याचे जीवन उद्ध्वस्त करणारी आहे त्याच्या विरुद्ध आता आम्ही सर्वच शेतकऱ्यांनी आवाज उठवलेला आहे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वडनेर शाखेमध्ये शेतकऱ्यांना दम देऊन शंभर टक्के रोखीने पैसे भरण्याची सक्ती केली जात आहे, शेतकऱ्याच्या ज्या ठेवी बँकेत अडकलेल्या असतात, त्या ठेवी तर परत करीत नाही पण त्याचे कर्ज खात्यामध्ये वर्ग न करता 100% रोखीने भरायला बँकेने आज आदेश दिलेले आहेत, याबाबत आम्ही बँकेचे एमडी शैलेश पिंगळे यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांनी उत्तर भाषेमध्ये आम्हाला सांगितलं की तुम्हाला मला फोन करायचा अधिकार कोणी दिला? लोकशाही मध्ये देशाच्या पंतप्रधानांना फोन करण्याचा नागरिकांना अधिकार आहे तर बँकेच्या अधिकार्याला का नाही ? विशेष म्हणजे कृषी मंत्र्यांच्या मतदार संघामध्ये शेतकऱ्यांची अशी अडवणूक व पिळवणूक होत असेल तर काय करावे आमची सरकारला विनंती आहे कि शासनाने नाशिक जिल्हा बँकेला आदेश द्यावे आणि शेतकऱ्याचा कर्ज वसूल करू नये उलट नियमबाह्य पद्धतीने काही अकृषिक कर्ज वाटले गेले आहे त्याबाबतीमध्ये बँकेने तातडीने कर्जवसुलीचे पावले उचलावी आणि ठेवीदारांचे पैसे परत द्यावे, शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज वाटप करावे, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे त्यांना नवीन कर्ज देत नाहीत आणि ज्यांना आत्ताच्या महात्मा फुले कृषी योजनेमध्ये ज्यांचे माफ झालेले त्यांना कर्ज वाटप झाले, अश्या प्रकारचा दुजाभाव नाशिक जिल्हा बँकेचे थांबावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी शेतकर्यांनी केली आहे !
पृथ्वीराज ठाकूर व कल्याणसिंग राजपूत या शेतकऱ्यांच्या शेताचा लिलाव संदर्भात त्यांचे नातेवाईक पैसे भरण्यास तयार असून बँकेचे एम.डी. पिंगळे हे शेतकऱ्यांची अरेरावीची भाषा करत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या संदर्भात कृषिमंत्री दादा भुसे यांनी जातीने लक्ष घालून आमच्या व्यथा सोडवाव्यात अशी मागणी यावेळी शेतकर्यांनी केली आहे !