पुणे : पुण्यातील पिरंगुट एमआयडीसीतील भागात एका सॅनिटायजर तयार करणाऱ्या कंपनीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीमध्ये १५ ते २० कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. तर, अद्याप १७ जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. घटनास्थळी ३ अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
सॅनिटाइझर तयार करणाऱ्या एसव्हीएस कंपनीला ही भीषण आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. या आगीमुळे कंपनीमध्ये १० ते १५ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी जेसीबीच्या सहाय्याने भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तहसीलदार अभय चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली असून, लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी सात लाख
मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल," अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान, पीएमएनआरएफ'मधून प्रत्येकी २ लाख रुपयांची, तसेच या दुर्घटनेतील जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.