📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बिडकर

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बिडकर

मालेगाव, दि. 8 ( मालेगाव लाईव्ह  वृत्तसेवा): कोविड-19 महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासह संभाव्य गर्दी टाळण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार मार्च, 2021 पासून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव येथील कार्यालयातील विविध प्रकारच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. तथापि, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार शासकीय कार्यालयांचे कामकाज 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या क्षमतेने सुरु ठेवण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव येथील कार्यालयीन कामकाज बुधवार 9 जून पासून पुढील प्रमाणे सुरु करण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

यामध्ये अनुक्रमे अनुज्ञप्ती नुतणीकरण, पत्ता बदल, दुय्यम प्रत, आयडीपी प्रकारातील कामे, वाहन नोंदणी, हस्तांतरण, कर्ज बोजा उतरविणे-चढविणे, नोंदणी प्रमाणपत्र दुय्यम प्रत, नोंदणी नुतणीकरण, परवाना विषयक सर्व कामकाज, खटला विषयक सर्व कामकाज सुरू करण्यात येणार आहे. तरी देखील नागरिकांनी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन सुविधेचा वापर करून अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही श्री.बिडकर यांनी केले आहे.

तर अनुज्ञप्ती कामकाजाचा दैनंदिन कोटा पुढील प्रमाणे शिकाऊ अनुज्ञप्ती 70, पक्की अनुज्ञप्ती 70,  तसेच योग्यता प्रमाणपत्राकरीता वाहन वर्गानुसार दैनंदिन कोटा टुरिस्ट/मिटर टॅक्सी 1, ऑटोरिक्षा 3, बस 2, हलके वाहन 8, जड वाहन 10 याप्रकारे दैनंदिन कोटा निश्चित करण्यात आला आहे.  त्याच प्रमाणे शिबीर कार्यालयाचे कामकाज देखील गुरुवार 14 जून पासून सुरु करण्यात येणार असल्याचेही श्री. बिडकर यांनी नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने