📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

लसीकरण आता केंद्राची जबाबदारी:पंतप्रधान, लसींच्या तुटवड्यावर महत्त्वाचा निर्णय, आता सर्वांना मोफत लस मिळणार

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असला तरी सध्या देशात लसींचा तुटवडा पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. आता केंद्र सरकार लसी विकत घेऊन राज्यांना मोफत लस पुरवठा करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. 21 जूननंतर 18 वर्षांवरील सगळ्यांना मोफत देण्याची घोषणा मोदींनी केली आहे. पण ज्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घ्यायची असेल त्यांनाही 150 रुपये देऊन लस घेता येणार आहे, अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

75 टक्के लसी केंद्र विकत घेणार

सोमवारी संध्या काळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात पंतप्रधान मोदींनी लसीकरणाबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या. याआधी देशात निर्माण होणाऱ्या लसींपैकी 50 टक्के लसी केंद्र सरकार, 25 टक्के राज्ये आणि 25 टक्के लस खासगी हॉस्पिटल विकत घेणार असे ठरले होते. पण राज्यांन 25 टक्के लसींचा पुरवठा होऊनही लसीकरण योग्य प्रकारे होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने आता केंद्र सरकार 75 टक्के लस खरेदी करुन राज्यांना मोफत देणार असल्याची घोषणा मोदींनी केली. लसींच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक राज्याला काही दिवस आधीच किती लसींचा पुरवठा केला जाणार आहे याची माहिती दिली जाईल त्याप्रमाणे राज्यांनी नियोजन करावे असेही मोदींनी सांगितले. लसीवरुन राजकारण करणे योग्य नाही असे सांगत मोदींनी विरोधकांनाही टोला लगावला आहे.

मोदींच्या मोठ्या घोषणा

1. 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनावरील लस मोफत देणार

2. लसीकरणावरील सर्व खर्च केंद्र सरकार करणार

3. केंद्र सरकार 75 टक्के लसींची खरेदी करुन राज्यांना मोफत देणार

4. पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य

5. खासगी हॉस्पिटल्सना 25 टक्के लस खरेदी करता येणार

6. देशात सध्या आणखी 3 लसींच्या निर्मितीवर काम सुरू

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने