📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी रासेयो विभागातर्फे सामाजिक संदेश रॅली

(मालेगाव) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय विभागाचे विशेष हिवाळी शिबिर टेहरे या दत्तक गावी चालू आहे. सदर शिबिरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. या उपक्रमांपैकी *बेटी बचावो बेटी पढाओ* हा उपक्रम आहे. हा सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी हा सामाजिक संदेश लिहिलेले पोस्टर्स हातात घेऊन प्रा. अबुलेस निहाल अहमद, डॉ. होमायरा, आणि प्रा मेश्रामकर सुनेत्रा यांच्या नेतृत्वाखाली गावात रॅली काढली आणि जागरूकता निर्माण केली. विद्यार्थिनींनी दिलेल्या घोषवाक्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. ग्रामस्थांनी  देखील रॅलीला चांगला प्रतिसाद दिला. 
सदर उपक्रमास प्राचार्य डॉ अन्सारी मोहम्मद हारून आणि समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने