📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कॅम्पातील अंध शाळेच्या खोलीला आग; निवासी शाळा सुरू नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला

मालेगाव शहरातील कॅम्प भागातील अंध शाळेतील एका खोलीमध्ये आग लागून भूमिपूजन झालेल्या हॉस्पिटलच्या साहित्याला आग लागून नुकसान झाले आहे, ज्या रूमला आग लागली त्या रूम शेजारीच एका रूम मध्ये एक मुलगा व एक सुपरवायझर होते, सुदैवाने वेळीच ते बाहेर निघाल्यामुळे मोठा अनर्थ टळला, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या अंध निवासी शाळा सुरू नाही अन्यथा खूप मोठी घटना घडली असते.

दरम्यान अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणली

या आगीमध्ये रुग्णालय बनण्यासाठी लागणाऱ्या frp सिलिकॉन मटेरियल काही प्रमाणात जाळून खाक झाले...

काही दिवसांपूर्वी भूमिपूजन झालेल्या मॉड्यूलर हॉस्पिटलचे काम सोमवार बाजार या परिसरात सुरू असून त्याला लागणारे साहित्य एकत्रित करून या रुममध्ये ठेवण्यात आले होते.

सकाळी 8 च्या सुमारास आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांना आगीचे मोठे लोळ दिसत होते त्यामुळे एकच धावपळ उडाली होती

अशा ठिकाणी हॉस्पिटलचे ज्वलनशील सिलिकॉन सीट या ठिकाणी ठेवले कसे व काळजी का घेतली गेली नाही असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

आगीचे कारण अजून कळले नसून पोलीस तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने