📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव शेतकरी संघाच्या वतीने किमान आधारभूत किंमतीत मका खरेदीस सुरुवात

मालेगांव तालुका शेतकरी सहकारी संघाच्या वतीने शासनाच्या खरीप हंगाम 2021-22 आधारभूत दराने मका खरेदी केंद्राचा शुभारंभ डाबली येथील मका उत्पादक शेतकरी श्री. प्रविण बारकु निकम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले.

शासनाने निळगव्हाण येथे या योजनेतील खरेदी करण्यात आलेल्या मक्याच्या साठवणुकीसाठी गोडावून उपलब्ध करुन दिले आहे. त्याच ठिकाणी शेतकरी सहकारी संघाचे खरीप हंगाम आधारभूत किमती अंतर्गत मका खरेदी केंद्राची सुरवात केली आहे. या योजने अंतर्गत मक्यास 1870/-, ज्वारी 2738/-, बाजरी 2270 /- रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला.

मालेगांव तालुक्यातील मका उत्पादक शेतकरी बांधवांनी शेतकरी सहकारी संघाकडेस मका विक्रीसाठी रितसर नोंदणी केली आहे. नोंदणी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांनी निळगव्हाण येथिल खरेदी केंद्रावर मका, ज्वारी, बाजरी विक्रीसाठी आणावा, यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मेसेज देण्यात येईल. त्यांनी शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन संघाच्या व्यवस्थापकांनी केले आहे.

यावेळी मका उत्पादक शेतकरी श्री. मोहन भिका कुमावर, वडेल श्री. सुरेश भागचंद हिरे, निंबायती, श्री. तात्यासाहेब गणपत आहिरे, निमगांव, श्री. बाजीराव संपत देशमुख, डाबली, श्री. तुकाराम सुपडू निकम, डाबली आदि शेतकऱ्यांसह शेतकरी संघाचे व्यवस्थापक श्री. पांडुरंग अण्णा बच्छाव, सेवक तुषार बाविस्कर, सागर हिरे, भदाणे यांचेसह हमाल-मापारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने