📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

शिवतीर्थ सुशोभीकरण ही जनतेची व शिवप्रेमींचीच संकल्पना - आम्ही मालेगावकर

मालेगाव : येथील शिवतीर्थ सुशोभीकरण कामास मंजुरी देऊन काम सुरू केल्याबद्दल मनपा प्रशासक तथा आयुक्त रवींद्र जाधव यांचा आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, सार्वजनिक नागरी सुविधा समिती, अखिल भारतीय मराठा महासंघ व तमाम शिवप्रेमींच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
मालेगावातील शिवतीर्थाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून शहरातील शिवप्रेमींच्या वतीने मनपा प्रशासनाकडे करण्यात येत होती. त्यासाठी वेळोवेळी समितीच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते  दोनवेळा भूमिपूजन होऊन देखील कामात सुरुवात झाली नसल्याबद्दल शिवप्रेमी मध्ये संताप निर्माण झाला होता. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व तमाम शिवप्रेमींच्या वतीने २० डिसेंबर २०२३ रोजी आंदोलन करण्यात आले होते, त्या आंदोलनात मनपा प्रशासनाच्या वतीने लेखी देण्यात आले होते की २६ जानेवारी २०२४ पूर्वी शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात येईल त्यानुसार रवींद्र जाधव हे मनपा आयुक्त पदी नियुक्त झाल्यावर त्यांनी सदर कामाची तात्काळ कार्यादेश देऊन सुरुवात केली. त्याबद्दल आयुक्त जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना निखिल पवार यांनी सांगितले की शिवप्रेमींच्या संकल्पनेतून शिवतीर्थाचे सुशोभीकरण होत आहे. त्यासाठी मालेगावच्या जनतेच्या कर रुपी पैशातून मनपा प्रशासन खर्च करणार आहे. त्यामुळे कोणतेही राजकीय नेत्याचे नाव संकल्पना म्हणून शिवतीर्थावर लावण्यात येऊ नये. तसेच जितेंद्र देसले यांनी सांगितले की शिवतीर्थ सुशोभीकरणाबाबत सर्वपक्षीय शिवप्रेमी व शिवजयंती उत्सव समिती यांचे मनपा प्रशासनाने बैठक घेऊन यात काय काय सुधारणा करता येतील या सूचना जाणून घेऊन त्याचा अंतर्भाव सुशोभीकरणात करण्यात यावा. भरत पाटील यांनी आपले मत मांडतांना सांगितले की शिवतीर्थाच्या परिसरात १९ फेब्रुवारी रोजी सामाजिक राजकीय संघटनांकडून तात्पुरते करण्यात येणाऱ्या सुशोभीकरणामुळे वाद निर्माण होतात ते होऊ नये यासाठी मनपा प्रशासनानेच तात्पुरते सुशोभीकरण करावे. त्याप्रमाणेच काम वेळेत व उच्च गुणवत्तेचे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त देवा पाटील यांनी यावेळी करून मनपा प्रशासनाचे आभार व्यक्त केले. 
यावेळी निखिल पवार, रामदास बोरसे, भरत पाटील, जितेंद्र देसले, कैलास शर्मा, विवेक वारुळे, कैलास तीसगे, सुशांत कुलकर्णी, देवा पाटील, संदीप आभोनकर, अनिल पाटील, सतीश उपाध्याय आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने