मालेगाव, दि. 24 जानेवारी 2024 : अपघात विरहित सेवा व इंधन बचत (केपिटीेएल) करणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात आला, मालेगाव येथील नवीन बस स्थानक व जुने बस स्थानक येथे रांगोळी काढून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढली
या सत्कारप्रसंगी मालेगाव शहर पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक संजय सानप, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, मोटार वाहन निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संजय सोनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश जाधव, पोलीस नाईक श्याम पवार, पोलीस शिपाई दशरथ पटले, एसटी प्रेमी अतुल लोढा, प्रितेश शर्मा, ज्युनिअर इंजिनिअर रा. प.नाशिक भुसारे मॅडम, मालेगाव स्थानक प्रमुख दिपक रामराजे, व दादाजी देवरे, बागुल, वाहतूक नियंत्रक नामदेव माळी, सुरंजे, मालेगाव आगारातील चालक वाहक व इतर कर्मचारी व अधिकारी हजर होते.
यावेळी पालक अधिकारी श्रीमती विसपुते यांनी चालक व वाहकांना प्रबोधन वर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, चालकांनी वाहन चालवताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच, वाहन चालवताना वेग मर्यादेत राहावे. तसेच, वाहन योग्य मेंटेनन्स करून घेणे आवश्यक आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
या सत्कारप्रसंगी अपघात विरहित सेवा देणाऱ्या चालकांना श्री. संजय सानप, श्री. देवेंद्र शिंदे, श्री. मोहन शिंदे, श्री. संजय सोनार, श्री. दिनेश जाधव, श्री. श्याम पवार, श्री. दशरथ पटले, श्री. अतुल लोढा, श्री. प्रितेश शर्मा, श्रीमती. रा. प. नाशिक भुसारे, श्री. दिपक रामराजे, श्री. दादाजी देवरे, श्री. बागुल, श्री. नामदेव माळी, श्री. सुरंजे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.