📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

भगिनी मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर शाळेत 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी गणेश आढाव

       भगिनी मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर, मालेगाव या शाळेत 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका आशाताई अहिरे, तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ आरती जोशी उपस्थित होत्या. विश्वकर्मा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री तुळशीराम मोरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या त्यात प्रामुख्याने श्रीराम,सीता,छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद व भारतीय सैनिकांच्या वेशभूषा करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सामूहिक कवायतीचा कार्यक्रम घेण्यात आला. याचबरोबर विद्यार्थ्यांनी समूहगीत देखील सादर केले.कार्यक्रमाची संपूर्ण नियोजन मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा गणेश कुलकर्णी यांनी केले. सौ स्नेहा कुलकर्णी व श्रीमती सोनाली पगार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी व पालक वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने