📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे पुस्तके भेट


मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे महाविद्यालयातील वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड कमी झालेली आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी अधिकाधिक वाढण्यासाठी इंग्रजी साहित्यातील लघुकथांचे संग्रह महाविद्यालयास भेट देण्यात आले. सदर उपक्रमांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अन्सारी मोहम्मद हारून मोहम्मद रमजान आणि शैक्षणिक समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार यांनी कौतुक केले. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. मेश्रामकर सुनेत्रा यांनी सदर पुस्तके उपलब्ध करून दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने