📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

निवडणूक कामात हलगर्जीपणा; मालेगावात 14 जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव, दि. 5 जानेवारी 2024 : मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातील निवडणूक कामकाज वेळेवर पूर्ण न केल्याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवक यांचा समावेश आहे.

याबाबत निवडणुक नायब तहसिलदार वरदा केशव सोमण यांनी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

 फिर्यादीत म्हटले आहे की, निवडणुक निर्णय अधिकारी सिमा आहिरे यांनी 29 ऑगस्ट 2023 रोजी आदेश काढून निवडणूक कामकाज वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी देखील निवडणूक कामकाज वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

या आदेशांना न जुमानता आरोपींनी निवडणूक कामकाज वेळेवर पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 चे कलम 32, भादवि 187 आणि 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा हिरे हे करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने