📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव महानगरपालिकेत महास्वच्छता विशेष मोहिमेचा शुभारंभ

मालेगाव, ६ जानेवारी २०२४: मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार संपुर्ण महाराष्ट्राच्या नागरी क्षेत्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर विशेष महा स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक ०६ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मालेगाव येथे आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांच्या हस्ते महा स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आयुक्त रविंद्र जाधव, उपायुक्त राजेंद्र फातले यांनी श्रमदान केले. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात दि. ०६/०१/२०२४ ते दि. २६/०१/२०२४ पर्यंत महास्वच्छता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी मालेगाव महापालिकेचे सर्व प्रभाग अधिकारी यांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केलेले असून प्रभाग क्रं. ०१,०२,०३,०४ व वार्ड स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांची नियुक्ती या विशेष महास्वच्छता मोहिमेसाठी करण्यात आलेली आहे. तसेच यामध्ये वार्डातील प्रतिष्ठत व्याक्ती, स्वयंमसेवी संस्था व नागरीकानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांनी केले आहे.

या मोहिमेत आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव, उपायुक्त राजेंद्र फातले, सहा.आयुक्त सचिन महाले, यांचेसह प्रमुख स्वच्छता निरीक्षक आनंदसिंग पाटील, एकबाल अहमद जान मोहम्मद यांचे सह वार्ड स्वच्छता निरीक्षक तसेच स्वयंमसेवी संस्थाचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात आला.

आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांनी यावेळी सांगितले की, स्वच्छता ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. या मोहिमेमुळे शहर स्वच्छ होण्यास मदत होईल आणि आपण सर्वांना एकत्रितपणे स्वच्छतेच्या संकल्पनेला बळ देऊ शकू.

या मोहिमेचे नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन मनपा स सहकार्य करणेचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने