📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात अल्पसंख्यांक दिवस साजरा

 (मालेगाव) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयात समान संधी कक्ष आणि विद्यार्थी विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्यांक दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी ऑनलाइन व्याख्याना द्वारे विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद अरुण मोहम्मद रमजान हे होते. शैक्षणिक समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थिनींना ‘भारतीय अल्पसंख्यांकांचे हक्क’ या विषयावर मार्गदर्शन केले. अल्पसंख्याकांना आपल्या हक्कांबद्दल, अल्पसंख्याकांसाठी असलेल्या विशेष शासकीय योजनांबाबत माहिती नसते. या साठी अल्पसंख्यांक समाजाला जागृत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या व्याख्यानात केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. समान संधी कक्षाच्या समन्वयक प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले. सूत्र संचालन डॉ. फरजाना यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा अताउर रहमान नुरी. यांचे सहकार्य लाभले. प्रा मुनव्वर अहमद यांनी उपस्थितांचे आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने