मालेगाव, दि. 16 डिसेंबर 2023: कॅम्प पोलिसांच्या पथकाने दोन जणांना बेकायदेशीर तलवार बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 16/12/2023 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे हददीतील विश्वरत्न चौक, पंचशिल नगर मालेगांव कॅम्प एक इसम बेकायदेशिरपणे लोखंडी तलवार स्वताचे कब्जात बाळगत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. या माहितीनुसार पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जगदाळे, सहापोउपनिरी जगन गुंजाळ, पो. हवा. किरण पवार, पो.ना. योगेश मोरे, पोना. हरीष कोळी, पोना दिपक हेंबाडे, असा पोलीस स्टाफ बातमीप्रमाणे खात्री करण्यासाठी विश्वरत्न चौक, पंचशिल नगर मालेगांव कॅम्प या ठिकाणी पाठविला.
पोलीस स्टाफला दोन इसम दहशत निर्माण करण्यासाठी तलवार बाळगतांना मिळुन आले. त्यापैकि एका इसमाकडे तलवार मिळुन आली. त्यांची नावे रोहीत चेतन पवार वय 23 वर्षे राह-शितलामाता नगर घm, मालेगांव कॅम्प आणि शंकर संसारे, राह. पंचशील नगर, मालेगाव कॅम्प अशी आहेत.
या दोन्ही इसमांवर मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं.261/2023 आर्म अॅक्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, तसेच मालेगांव कॅम्प उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख साहेब यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलिसांनी ही कामगिरी केली आहे
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोना योगेश मोरे हे करीत आहेत.