📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणा-यांवर पोलीसांची मालेगाव व घोटी परिसरात धडक कारवाई

0
मालेगाव, दि. २४ डिसेंबर २०२३

आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ व्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव तसेच अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने आझादनगर पोलीस ठाणे ह‌द्दीत शब्बीर नगर परिसर तसेच घोटी पोलीस ठाणे हद्‌दीत वासाळी परिसरात अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक २३/१२/२०२३ रोजी आझादनगर पोलीसांनी मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे मालेगाव शहरातील शब्बीरनगर परिसरात इसम नामे १) अश्पाक अहमद शेख युसूफ, वय २४, व २) तारीक अहमद शेख युसूफ, वय २६, दोघे रा. शब्बीर नगर मालेगाव यांचे कब्जातून एक लोखंडी धारदार तलवार व एक गोलाकार पाते असलेली धारदार कुऱ्हाड जप्त केली आहे. सदर इसम हे काहीतरी दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीररित्या धारदार घातक शस्त्रे कब्जात बाळगतांना मिळून आले असून त्यांचे विरुध्द आझादनगर पोलीस ठाणे गुरनं २३८/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह भादवि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच घोटी पोलीस ठाणे हद्दीत वासाळी ते बारशिंगवे रोडवर, कवरवाडी-वासाळी शिवारात इसम नामे १) संजय काशिनाथ गभाले, वय ३५, व २) सुधीर गोरख कोरडे, वय ३०, दोघे रा. वासाळी, ता. इगतपुरी असे त्यांचेकडील मारूती इको कारमध्ये एक धारदार तलवार विनापरवाना बेकायदा गुन्हेगारी कारवाया करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळून आले आहे. सदर इसमांविरुध्द घोटी पोलीस ठाणेस गुरुनं ६१२/२०२३ भारतीता हत्यार कायदा कलम ४/२५ सह मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ व्या पाश्र्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांविरुध्द वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल तर, नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अवैध व्यवसायविरोधी हेल्पलाईन कमांक ६२६२ २५ ६३६३ यावर संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)