खेड्यापाड्यात अनेक ठिकाणी बँकिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात, अशातच महालपाटणे गावात फिनो पेमेंट बँक शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे, हा कार्यक्रम मुख्याधिकारी किरण खैरनार यांच्या मार्फत करण्यात आला व किंवा पेमेंट बँक शाखेचे उद्घाटन देवळा बाजार समितीचे माजी संचालक शिवाजी अहिरे आणि बाजार समितीचे माजी सदस्य दादाजी अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शाखेच्या उद्घाटनाने नागरिकांचे होणारे हाल कमी होणार आहेत कारण यापूर्वी महालपाटणे ,देवपुरपाडे ,रणदेवपाडे गावातील लोकाना आर्थिक व्यवहार, तसेच पैसे काढणे आणि टाकण्यासाठी दुसऱ्या गावी जावे लागायचे, गावातील ज्येष्ठ नागरिकांना शासनातर्फे दिला जाणारी आर्थिक मदत काढण्यासाठी देवळा जावे लागायचे पण आता गावातच बँक आल्यामुळे गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
फिनो पेमेंट बँक शाखा सुरू करण्यामागचे उद्दिष्ट हेच आहे की गावातील प्रत्येक घरात बँकेची सुविधा पुरवणे, हया बँकेचे सॉफ्टवेयर बनवण्यातही त्यांचं मोलाच योगदान लांभलंय, फिनो पेमेंट बँकेत अकाऊंट ओपन करण्यासाठी केवळ आधार आणि पॅनकार्ड ची आवश्यकता आहे आहे २ मिनिटात अकाऊंट ओपन करून त्वरित एटीएम आणि पासबुक मिळते आणि फिनोपे हे मोबाईल ऍप पण तुमच्या मोबाईल मधे इन्स्टॉल करून खातेदार व्यवहार ऑनलाइन करू शकतात आणि महत्त्वाचे म्हणजे १० ते १७ वर्षाच्या आतील मुलांसाठी भविष्य सेविंग अकाउंट सुरू करता येते तसेच व्यापारी वर्गासाठी करंट अकाउंट ची सुविधाही उपलब्ध आहे.
फिनो पेमेंट बँकमार्फत वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत, कुठल्याही बँकेतून पैसे काढू किवा टाकू शकता तसेच लाइट बिल, दुसऱ्या कुठल्याही बँकेचा लोनचा ई एम आय, एलआयसी हप्ता भरू शकता, अशा प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
यावेळी महालपाटणे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री नाना भागा अहिरे व्हा. चेअरमन श्री विनोद ठाकरे आणि सोसायटीचे सदस्य श्री वंसंत भाटेवाल,श्री उत्तम बच्छाव ,केदा बच्छाव,छब्बू भामरे, एडवोकेट सोनवणे अण्णा, बाळासाहेब खैरनार ,सुनील निकम (शिवसेना देवळा तालुका विभाग प्रमुख) गावचे पोलीस पाटील ,चेतन चित्ते,योगेश बंदरे,गणेश भांडोर,रवींद्र खरोले,विकास खरोले,महेश खरोले,समाधान जाधव,समाधान ,सागर खरोले,गावांजी बंदरे, ब्रांच मॅनेजर पवन कुमावत,अकाऊंट मॅनेजर कादीर खाटीक,
ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य, विकास सोसायटी चेअरमन,व्हा चेअरमन, संचालक ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळ आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.