निमगाव ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मालेगावच्या प्राध्यापिका सौ. प्रतीक्षा प्रयाग नहार यांना भूपाल नोबेल युनिव्हर्सिटी, उदयपुर, राजस्थान यांच्याकडून *विद्यावाचस्पती* ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ. रविंद्र कांबळे (सहयाेगी प्राद्यापक - फार्मासुटिक्स विभाग, भूपाल नोबेल खासगी विद्यापीठ, उदयपूर - राजस्थान) यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. नहार यांनी फार्मासुटिकल विषयात संशोधन केले. त्यांनी विविध नैसर्गिक पॉलिमर वापरून विशिष्ट अशी गोळी (टॅबलेट) बनवली.
सौ. नहार यांच्या या यशस्वी संशोधनाबद्दल माजी मंत्री डॉ. प्रशांतदादा हिरे, माजी शिक्षक आमदार डॉ. अपूर्वभाऊ हिरे, कृऊबा चेअरमन डॉ. अद्वय (आबा) हिरे पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश पाटील, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.