📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

व्हि. डि. खैरनार ज्युनिअर कॉलेजची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत गौरवशाली नोंद

व्हि. डि. खैरनार ज्युनिअर कॉलेज, चिखलओहोळ येथील इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी नकुल ज्ञानेश्वर सरदान व ओम अंकुश सरदान यांनी राज्यस्तरीय तांग-सू-डो क्रीडा स्पर्धा 2025 पिंपळनेर येथे उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत कुमार ओम अंकुश सरदान यांनी सुवर्णपदक (Gold Medal) मिळवले तर कुमार नकुल ज्ञानेश्वर सरदान यांनी रौप्यपदक (Silver Medal) पटकावले.

या उल्लेखनीय यशाबद्दल कॉलेजचे सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य आणि विद्यार्थी वर्गाकडून दोन्ही विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने