📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अक्षयतृतीया मुहूर्तावर देवपूरपाडे येथे उत्क्रांती गृह उद्योगाचे उद्घाटन

प्रतिनिधी देवळा | गणेश आढाव

 देवपूर पाडे येथील उपक्रमशील उद्योजक दोधा काशिनाथ अहिरे यांनी उत्तुंग भरारी घेत देवपूर पाडे येथे उत्क्रांती गृह उद्योग सुरू केला आहे. या गृहउद्योगामार्फत घरगुती मसाले, सर्व प्रकारचे पापड, पुरणपोळी, सर्व प्रकारच्या चटण्या, सर्व प्रकारचे लोणचे, शेवई,जेवणाचे डबे, इत्यादी पदार्थांची घरपोच सेवा देण्याचा मानस त्यांचा आहे. 

ना नफा ना तोटा या तत्त्वावर आपले पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरवण्याचा मानस त्यांचा आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळा पंचायत समितीचे माजी सभापती सुखदेव काळू अहिरे होते.
दीप प्रज्वलन स्वामी समर्थ रामदास महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभिमन देवराम अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर उद्घाटक म्हणून देवळा पंचायत समितीचे बचत गट विभागाचे अधिकारी श्री. वाळके उपस्थित होते कार्यक्रमासाठी देवपूर पाडे गाव परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने