मालेगाव - योगेश पगारे
तक्रारदार यांना कायदेशीर कारवाईकामी अधिकारपत्र प्राप्त असलेल्या जमीन मालक यांचे जमिनीमध्ये मुरूम उत्खनाचे मुल्य नियमानुसार पाच पट दंड आकारणी बाबत उपविभागीय अधिकारी, नाशिक यांचे कडील अपीलात आदेश होवुन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशी करीता आलोसे नरेशकुमार तुकाराम बहिरम, तहसिलदार, नाशिक यांच्या कडे पाठविण्यात आले होते. आलोसे यांनी स्थळनिरीक्षण करीता बोलावले त्यावेळी आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडे १५,००,०००/- रु. लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दिली..
सदर तक्रारीवरून ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान आलोसे नरेशकुमार तुकाराम बहिरम, तहसिलदार, नाशिक यांनी तक्रारदार यांचे कडे १५,००,०००/- रु. लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दि.०५.०८.२०२३ रोजी आलोसे यांचे कर्मयोगी नगर येथील राहते घराचे अपार्टमेंटचे पार्कींगमध्ये स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले असुन त्यांचेविरुद्ध भ्र.प्र.का.सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.
सदरची कारवाई मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधिक्षक ला. प्र. वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक व मा. श्री. माधव रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन पुढील तपास श्री. संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि, नाशिक करीत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक तर्फे नागरीकांना आवाहन करण्यांत येते की, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्रातील कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे या कार्यालयाकडे तकार नोंदवावी.
कार्यालयीन वेळेनंतर या सुट्टीचे दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणाली बाबत या तक्रारीबाबत माहिती
पाहिजे असल्यास खालील मोबाईल क्रमांक व दूरध्वनीवर संपर्क साधावा महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सोईच्या दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार करण्यासाठी लँडलाईन ते लॅन्डलाईन व मोबाईल ते लॅन्डलाईन अशी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा