📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नेहरू विद्यालयात व्याघ्र संरक्षण दिन उत्साहात साजरा

 वाघांचे संरक्षण करून पर्यावरणाचे जतन करु या :- विवेक सावंत
         दिवसेंदिवस जंगलातील वाघांची संख्या कमी होत असल्याने निसर्ग चक्रात अडथळे निर्माण होत आहेत म्हणून वाघांचे संरक्षण व संवर्धन करून पर्यावरणाचे जतन करु या असे प्रतिपादन विवेक सावंत यांनी केले ते मविप्र समाज संचलित नेहरू विद्यालय सोमपूर ता. बागलाण येथे व्याघ्र संरक्षण दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात बोलत होते.
          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वन व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सुभाष शिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सनिल सातपुते ताहराबादचे वनरक्षक आकाश कोळी कातरवेल चे वनरक्षक माणिक मोरे, जेष्ट शिक्षक राजेंद्र निकम, प्रविण जगताप, जिभाऊ खैरणार, किशोर देवरे,प्रशांत देवरे, कैलास हिरे, श्रीकांत तवर, सुवर्णा देवरे, निलेश खैरणार, दिपाली कापडणीस,सुमित भदाणे, शालिनी सुर्यवंशी, क्रांती गांगुर्डे, रोहिणी अहिरराव, तुषार भामरे, दिपाली देसले, पुनम पवार आदी उपस्थित होते. 
           कार्यक्रम यशस्वितेसाठी विलास पवार, गणेश सोनवणे, शरद शिंदे, आबा पवार,कविता पाटोळे, आशा घरटे यांनी परिश्रम घेतले. 
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिभाऊ खैरणार यांनी व्यक्त केले

बक्षिस वितरण करतांना मुख्याध्यापक सुनिल सातपुते व बक्षिस पात्र विद्यार्थी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने