📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे याचे कार्य प्रेरणादायी:- विजय भामरे

मालेगाव - योगेश पगारे 

 प्रत्येक व्यक्ती मध्ये स्वाभिमान व आपल्या राष्ट्रावर प्रेम असेल तर भारत विश्वगुरू बनू शकतो . विश्व गुरु होण्यासाठी लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जिवनकार्य प्रेरणादायी असे विजय भामरे यांनी केले ते सोमपूर ता.बागलाण येथील मविप्र समाज संचलित नेहरू विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 
        लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन विजय भामरे यांनी केले तर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन जिभाऊ खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले.
       कार्यक्रमानिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थी मिनल अंकुशे, भाग्यश्री राखपसरे, वेद नेरकर , गायत्री भामरे यांनी भाषण केले. 
        विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक किशोर देवरे, सुवर्णा देवरे, जिभाऊ खैरनार यांनी टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती दिली
         व्यासपीठावर मुख्याध्यापक सुनिल सातपुते जेष्ट शिक्षक राजेंद्र निकम, विवेक सावंत, प्रविण जगताप, जिभाऊ खैरणार, किशोर देवरे, प्रशांत देवरे,विजय भामरे, कैलास हिरे, सुवर्णा देवरे, निलेश खैरणार, दिपाली कापडणीस,शालीनी सुर्यवंशी, रोहिणी अहिरराव, तुषार भामरे, दिपाली देसले , पुनम पवार, गणेश शेळके, मंगेश सोनवणे आदी उपस्थित होते. 
        कार्यक्रम यशस्वितेसाठी विलास पवार, गणेश सोनवणे, शरद शिंदे, आबा पवार, कविता पाटोळे, आशा घरटे यांनी परिश्रम घेतले. 
कार्यकमाचे सुत्रसंचालन व आभार कैलास हिरे यांनी व्यक्त केले


   
लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना विजय भामरे, जिभाऊ खैरणार व शिक्षक वृंद

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने