📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मतदान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य; प्रांताधिकारी श्री नितीन सदगीर


( मालेगाव) येथील जे ए टी कला विज्ञान आणि वाणिज्य महिला महाविद्यालयात मतदार साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या मतदार साक्षरता क्लब आणि इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नव मतदारांना साक्षर करण्यासाठी आणि त्यांच्याद्वारे समाजातील इतर घटकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारून मोहम्मद रमजान यांच्या शुभहस्ते झाले. सदर कार्यशाळेसाठी मालेगाव चे प्रांताधिकारी श्री नितीन सदगीर, नायब तहसीलदार श्री हंडोरे, आणि मालेगाव बार कौन्सिलचे उपाध्यक्ष एडवोकेट नविद अख्तर यांची विशेष उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी स्वागत पर मनोगत व्यक्त केले. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा सुनेत्रा मेश्रामकर यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ लोधी कमीज फातिमा यांनी कार्यशाळेचा हेतू विशद केला. प्रांत अधिकारी श्री नितीन सदगीर यांनी महसूल सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मतदार यादीत आपले नाव नसल्यास त्वरित नोंदवून घेण्याची विनंती केली. त्यासाठी महसूल विभागा तर्फे सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. एडवोकेट नविद अख्तर यांनी देखील विद्यार्थिनींना बहुमोल मार्गदर्शन केले. मतदान करणे का आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अन्सारी हारून यांनी महसूल विभागाच्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले. याप्रसंगी तहसील कार्यालयातील सेतू विभागाचे जमील शेख, राहुल अहिरे, देवा पाटील, जितू बोरसे, महेश कासार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग , लियाकत पठाण आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा नईम अहमद, कु. हुसना कौसर, कु आफिया कौसर, कु खदिजा सदफ,, कु. अदिबा इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. प्रा मेश्रामकर यांनी आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने