📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जनार्दन पवार यांनी स्वीकारला मालेगाव महानगरपालिका उपायुक्त पदाचा कार्यभार

शासनाचे नगरविकास विभागाकडिल दिनांक २५ जुलै, २०२३ चे मालेगाव महानगरपालिकेत उपायुक्त पदावर जनार्दन पवार यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने आदेशानूसार आज दिनांक ०१ ऑगस्ट, २०२३ रोजी जनार्दन पवार यांनी मालेगाव महानगरपालिकेत उपायुक्त पदाचा कार्यभार स्विकारला. यापूर्वी त्यांनी तळोदा व धरणगाव या जळगाव जिल्हातील नगरपालिकामध्ये मुख्याधिकारी पदाची सेवा बजावलेली आहे. तत्पूर्वी त्यांनी मा.शासनाच्या पाटबंधारे विभागात संशोधन सहाय्यक या पदावर सेवा केल्यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची सन २०१२ मध्ये परिक्षा उत्तिर्ण होवून मुख्याधिकारी गट ब या पदावर हजर झाले.
 या प्रसंगी उपायुक्त सुहास जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सहा.आयुक्त सचिन महाले, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, आस्थापना पर्यवेक्षक अनिल कोठावदे आदी अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने