महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला मद्यसाठा निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, येवला पथकाने जप्त केला आहे
पथकाला दि. 29/07/2023 रोजी नाशिक जिल्ह्यातून गोवा राज्यात निर्मित केलेला व विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला एका मोठ्या सहा चाकी आयशर ट्रकमधुन वाहतुक होणार असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी वेगवेगळे पथक बनवून येवला शहर व परिसरात थांबुन सदरच्या संशयित वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना त्यांना विंचुर चौफुली येथे एक संशयित आयशर ट्रक "दिसुन आला. सदरचा ट्रक पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने तो तपासणीसाठी न थांबवता अधीक वेगाने लोकांच्या व वाहनांच्या गर्दीमधुन औरंगाबाद नाशिक रोडने चांदोरीच्या दिशेने पळविला. त्यामुळे सदरच्या संशयित वाहनाचा थरारकपणे पाठलाग करुन येवला विभागाच्या पथकाने सदरचे वाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांब्यासमोर, नाशिक औरंगाबाद रोड, चांदोरी चौफुली, मु.पो. चांदोरी, ता. निफाड, जि. नाशिक या ठिकाणी पकडले असता सदर वाहनाचे चालकाकडे वाहनातील मालाची विचारपुस केली असता त्याने वाहनामध्ये असलेल्या मालाबाबत बनावट दिसुन येत असलेले इनव्हाईस दाखवुन उडवाउडवीची उत्तरे दिली व पुन्हा घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पथकाचा सदर वाहनचालकावरील संशय बळावल्याने त्यांनी सदर वाहनाची कसून तपासणी केली असता त्यांना सदरच्या विटकरी रंगाचे मालवाहतुक वाहन क्र.MH-04 KU 3724 मध्ये गोवा राज्यात निर्मित केलेला व विक्रीसाठी असलेला म्हणजेच महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा कागदी खोक्यांच्या पाठीमागे लपवलेल्या परिस्थितीत मिळुन आला आहे.
रु.52,43,586 रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये इम्पिरियल ब्ल्यू, रॉयल चॅलेंज, ऑल सिजन या मद्याचे 162 बॉक्स व ट्युबर्ग स्ट्रॉंग विअरचे 6 बॉक्स तसेच इतर साहित्य तसेच सहा चाकी मालवाहतुक ट्रक इ. चा समावेश आहे
यात कारवाईत शामु रज्जु गौड़ (मालवाहतुक वाहनाचा चालक व मालक) वय - 37 वर्ष रा. मुंबई व मोहम्मद सुलतान असलम अन्सारी, वय- 26 वर्ष, रा. रायगड यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.डॉ.श्री.विजयकुमार सुर्यवंशी सो., आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, म. रा. मुंबई, ह. तडवी मा.श्री. सुनिल चव्हाण सो.. संचालक (अं. व द.), राज्य उत्पादन शुल्क, म.रा.मुंबई, मा. डॉ. श्री. वा. सो., विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक, मा. श्री. शशिकांत वि. गर्जे सो., अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, नाशिक तसेच मा. श्री. हर्षवर्धन बा. शिंदे सो., उपअधीक्षक (मु), राज्य उत्पादन शुल्क, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क, येवला विभाग, जि. नाशिक चे निरीक्षक श्री. विठ्ठल चौरे, दुय्यम निरीक्षक श्री. संजय वाकचौरे, श्री. प्रविण मंडलिक, सहा. दुय्यम निरी. श्री. अवधुत पाटील व जवान सर्वश्री. विठ्ठल हाके, अमन तडवी, संतोष मुंडे व मुकेश निंबेकर यांनी यशस्वीरित्या पर पाडली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री. विठ्ठल चौरे हे करित आहेत.
तसेच जनतेस अवाहन करण्यात येते की, अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18008333333 व व्हॉटस् अप क्रमांक- 8422001133 तसेच दुरध्वनी क्रमांक 0253-2581033 यावर संपर्क साधावा.