📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

शहरातील वाढत्या चोऱ्यांवर आळा घाला; आम्ही मालेगावकर चे अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन

मालेगाव : येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांना शहरातील विविध चोरीच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
       शहरात गेल्या काही दिवसात चोरीचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या चोरीच्या घटना बघता नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे. शहरातील विविध ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल चोरीचे देखील प्रमाण वाढले आहे. योग्य प्रकारे गाडी लॉक असतांना देखील चोरटे गाडी घेऊन पसार होतात. तसेच शेकडो पाण्याच्या मोटर चोरीला जात आहे. याबाबत सीसीटीव्ही फुटेज पोलीस यंत्रणेच्या स्वाधीन केले आहे. 
    शहरात मोबाईल व सोन साखळी स्नॅचिंग एक प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्याने चालत असतांना फोनवर बोलत असतात आणि काही सेकंदात मागून चोरटे मोटार सायकलवर येतात आणि मोबाईल, सोनसाखळी घेऊन पसार होतात. याबाबत पोलीस यंत्रणेला तश्या तक्रारही प्राप्त झाल्या आहेत. तरी देखील याचा योग्य तो तपास होतांना दिसत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. याला नक्की कारण काय ? या सर्व प्रकारावर अंकुश का लागत नाही ? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
              मालेगाव शहरात पोलीस गस्त वाढवण्यात यावी, चौका चौकात पोलिसांची उपस्थिती जाणवावी यासाठी पॉईंट पोलिसांची नेमणूक करण्यात यावी, चोरीच्या घटनांचा तपास जलद गतीने व्हावा यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात यावी, पोलीस दलाची कुमक वाढविण्यात यावी. मालेगाव शहरात चोरीच्या घटनांचा जलद गतीने तपास करून गुन्हेगारांवर कठोर कारवाही करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या 
सदर विषयावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे आश्वासन अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी समितीस दिले.
यावेळी निखील पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, भरत पाटील, कैलास शर्मा, विवेक वारूळे, यशवंत खैरनार, शेखर पवार, गणेश पाटील, दिपक पाटील, प्रवीण चौधरी, गोपाळ सोनवणे, संदीप मोरे, करण भोसले, श्याम गांगुर्डे, रोषण गांगुर्डे, आनिल पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने