के. बी. एच .विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे पहिल्या महिला शिक्षिका, महाराष्ट्रातील स्ञीमुक्ती चळवळीच्या पहिल्या अग्रणी, कवियिञी, लेखिका व थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षक दिन(बालिका दिन) म्हणून विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कैलास दाभाडे होते. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजय शिंदे, पर्यवेक्षक सुभाष निकम, जेष्ठ शिक्षिका श्रीमती जे.एस. देवरे, व्याख्याते संजय नेरकर ए.के खेडकर ,सांस्कृतिक विभागाचे राजेश धनवट उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवराच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी हितेश माळी व निनाद खैरनार यानी उत्कृष्ट भाषणे केली.
व्याख्याते संजय नेरकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विशद केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कैलास दाभाडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या अद्वितीय कार्याची माहिती विशद केली आणि त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात असे प्रतिपादन करून विनम्र अभिवादन केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले.आभार राजेश धनवट यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील सूर्यवंशी, क्रीडाशिक्षक जे.टी. ठाकरे,सौ. आशा पगार तसेच शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर बंधूंचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर बंधू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.