📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारे तसेच प्रशासकीय कामकाज उल्लेखनीय रित्या करणारे उपप्राचार्य राजेंद्र पाटील यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद -विद्यामंदिर संस्थेचे संचालक अनिल पवार

  के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथील  उपप्राचार्य राजेंद्र पाटील ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापुर्ती सोहळा प्राचार्य कैलास दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संचालक अनिल पवार  ,माजी उपप्राचार्य रवींद्र शिरूडे उपस्थित होते . व्यासपीठावर सत्कारमूर्ती उपप्राचार्य राजेंद्र पाटील, सौ.सुलभा पाटील, पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजय शिंदे, पर्यवेक्षक सुभाष निकम , कार्यालयीन प्रमुख जितेंद्र विसपुते,जेष्ठ प्राध्यापिका शितल शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊसाहेब हिरे, लोकनेते व्यंकटराव हिरे, माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करून सेवापुर्ती सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. सर्वप्रथम कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या समाधीचे व पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
         सत्कारमूर्ती उपप्राचार्य यांचा सत्कार प्रमुख अतिथी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संचालक अनिल पवार (तात्यासाहेब) ,प्राचार्य कैलास दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आला. सौ.सुलभा पाटील यांचा सत्कार प्राध्यापिका शितल शिंदे यांच्या हस्ते चांदीची गणेशाची मूर्ती ,सन्मानपत्र, शाल,कपडे, साडी,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी के. वाय. देवरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज प्राध्यापक विश्वास पगार, नात वीरा पाटील व मुलगा रोहित पाटील पत्नी सुलभा पाटील यांनी मनोगतातून उपप्राचार्य राजेंद्र पाटील सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
          प्रमुख अतिथी माजी संस्थेचे संचालक अनिल पवार यांनी उपप्राचार्य राजेंद्र पाटील यांच्या कामाचा गौरव करताना सरांनी कर्तव्यनिष्ठपणे आणि जबाबदारी पूर्वक ३५ वर्ष उपशिक्षक, पर्यवेक्षक तसेच उपप्राचार्य म्हणून काम करताना आपल्या सेवेबद्दल नितांत प्रेम ध्यास आणि विद्यार्थी केंद्रबिंदू मानून नेहमीच विद्यार्थी हिताचाच विचार केला . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली. अत्यंत मनमिळावू, संयमितपणा, बौद्धिकचमक दिमाखदार व आकर्षक व्यक्तिमत्व यामुळे त्याची वेगळीच छाप विद्यार्थ्यांवर पडत असे गौरवोद्गार सत्कार समारंभ प्रसंगी काढले.
         सत्कारमूर्ती उपप्राचार्य राजेंद्र पाटील यांनी ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतील आठवणींना उजाळा देत संस्थेविषयी व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कैलास दाभाडे  यांनी उपप्राचार्य राजेंद्र पाटील सराच्या ३५ वर्षाच्या प्रामाणिक कामाचे कौतुक करून विद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्ती नंतरचे आपले उर्वरित आयुष्य सुख-समृद्धी व भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा दिल्या.
      सत्कारमूर्ती चा परिचय व सन्मानपत्राचे वाचन राजेश धनवट यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार शशिकांत पवार यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक बंधू भगिनी ,शिक्षकेतर बंधू उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील सूर्यवंशी ,हेमंत पगारे ,सौ आशा पगार क्रीडा शिक्षक संजय निकम शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर बंधूंचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने