जायखेडा येथील भूमिपुत्र व भारतीय सैन्य दलातील जवान सारंग अशोक अहिरे यांचा कर्तव्यावर असताना शहीद झाले आहे त्यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या गावी जायखेडा येथे साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला..
त्यांच्या मृत्यूने जायखेडा सह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे
शेतकरी कुटुंबातील असलेले वीर जवान सारंग अशोक अहिरे प्रतिकूल परिस्थितीतून वयाच्या 19 व्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते, वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी शहीद झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सैन्य दलातील इंजिनिअरिंग 103 कमांड मध्ये ते कार्यरत होते.
सारंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.