मालेगाव : वाढदिवस म्हटला की मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च केला जातो. मात्र या खर्चाला फाटा देत तालुक्यातील टेहरे येथील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले आहे.
मुंबई- आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. या अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी लोकार्पण केलेली रुग्णवाहिका देवदूत ठरणार आहे. टेहरे येथील तरुण भूषण पवार, कल्पेश शेवाळे व अविष्कार भुसे मित्र परिवाराच्या संकल्पनेतून रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम पार पडला. टेहरे येथील या तरुणांनी खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी पोटी रुग्णवाहिका खरेदी करून तिचे लोकार्पण केले आहे. रुग्णवाहिका
नितांत गरज ओळखत गाव व परिसरातील वाढदिवसाचा खर्च टाळत नवीन रुग्णवाहिका गावाच्या मदतीसाठी निःशुल्क उपलब्ध करून दिली जाणार आहे. याप्रसंगी चंद्रकांत शेवाळे, चेतन पवार, प्रभाकर शेवाळे, गोकुळ शेवाळे दिलीप शेवाळे, जिभाऊ कुवर उपस्थित होते.