रावळगाव प्रतिनिधी :- श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता. बागलाण जि. नाशिक संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव ता. मालेगाव जि. नाशिक येथील रसायनशास्त्र विभाग व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना विद्यार्थी दसेपासूनच उद्योग -धंद्याचे ज्ञान आत्मसात व्हावे म्हणून महाविद्यालयातील रसायनशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाच्या आज दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी "Silk Production Unit" , नामपूर, ता. सटाणा, जि. नाशिक येथे एक दिवसीय औद्योगिक अभ्यास सहलीचे आयोजन कारण्यात आले.
या सहलीमध्ये रेशीम उद्योग करणारे श्री. सुनील एकनाथ आहिरे यांनी रेशीम शेती संबंधी सविस्तर अशीच माहिती दिली या प्रसंगी ते म्हणाले की, "शेती व्यवसाय हा दिवसेंदिवस बेभरवशाचा बनत चालला आहे. त्यातल्या त्यात गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाला सामोरे जावे लागते आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना तर अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत तुतीची लागवड करता येते. रेशीम उद्योग करण्यास भरपूर वाव आहे कारण हा उद्योग कृषी व वनसंपत्तीवर आधारित असून यामध्ये रोजगाराची मोठी क्षमता आहे."
रेशीम उद्योगासाठी लागणारे रेशीम अळी, तुती लागवड, वातावरण, दिवस, खर्च, श्रम इत्यादींबाबत उद्योगाची संपूर्ण माहिती रसायनशास्त्र विभागातील प्रा. जयवंत.के. आहिरे यांनी दिली.
रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. मोहिनी एस. निकम यांनी 'Chemical processing of raw silk to textile fiber' याचे पुढे मार्गदर्शन केले.
प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.लक्ष्मी बोरसे यांनी विद्यार्थ्यांचे रेशीम उद्योगाबद्दलचे असणारे कुतूहल पाहता त्यांच्या शंकांचे निरसन केले.
सदर औद्योगिक भेटीचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुरेश दादाजी वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. बी. गोसावी व परीक्षा विभागप्रमुख श्री. जे. व्ही. मिसर यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे झाले. भेटीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा.अदिती काळे, प्रा.सोनाली निकम, प्रा.मयुरी निकम यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर भेटीसाठी विज्ञान शाखेचे २५ विद्यार्थी सहभागी झाले होते.