रावळगाव प्रतिनिधी :- श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता. बागलाण जि. नाशिक संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव ता. मालेगाव जि. नाशिक येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन बेळगाव पाडे येथे करण्यात आले असून या शिबिरादरम्यान आज दि. २४ डिसेंबर २०२२ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव ता. मालेगाव जि. नाशिक येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ग्रामपंचायत कार्यालय बेळगाव पाडे व एस. के. बी. बहुउद्देशीय संस्था रावळगाव यांच्या संयुक्त विद्येमाने मोफत आरोग्य तपासणी व आरोग्य विषयक समुपदेशन करण्यात आले.
यावेळी गावातील एकूण ६४ स्त्री-पुरुषांचे आरोग्य विषयक तपासणी करून समुपदेशन करण्यात आले. यासाठी डॉ. प्रदीप पी. शेवाळे (संचालक, श्री स्वामी समर्थ क्लिनिक, रावळगाव) यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास श्री. भारत यादव अहिरे (सरपंच, बेळगाव पाडे, श्री. गोटीराम रामदास सोनवणे (उपसरपंच, बेळगाव पाडे), ग्रामपंचायत सदस्य श्रीमती गोदाबाई राजु सोनवणे,
श्रीमती मंगलबाई कडू चिंचोले, सौ. उषाबाई सुभाष सोनवणे, श्री. इंद्रकुमार केवळ सोनवणे, श्री बापू देवचंद शिंदे, सौ. सुनंदा दिलीप हिरे, सौ. सोनाली पंढरीनाथ सोनवणे, यांच्यासह, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी कृष्णा गेंद, प्रथमेश बोरसे, सोनवणे धंनजय, अनिकेत वानखेडे, कुणाल आखाडे, सिद्धार्थ खरे, राजदीप म्हसदे, नरेंद्र राक्षे, महेश शेगर, कृष्णा शिंदे, नितीन कऱ्हे, गणेश लाड, साहिल कानडे, गौरव बच्छाव, समीर देवरे, चेतन सोनवणे, धनंजय अहिरे यांच्यासह महाविद्यालयातील अनेक स्वयंसेवक सदर राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश महाजन, यांच्या मार्गदर्शना खाली परिश्रम घेत आहेत, यासाठी स्वयंसेवकांना, श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता. बागलाण जि. नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश दादाजी वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र बी. गोसावी यांनी शुभेच्छा दिल्या