📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अपूर्व विज्ञान मेळावा बाल वैज्ञानिकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल बाल वैज्ञानिकांचा कौतुकास्पद सहभाग-प्राचार्य डाॅ.सुभाष निकम

   के.बी.एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे अपूर्व विज्ञान मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कैलास दाभाडे होते.यावेळी प्रमुख अतिथी मेळाव्याचे उद्घाटक म.स.गा. महाविद्यालय मालेगाव कॅम्प प्राचार्य डॉ. सुभाष निकम , सेवानिवृत्त उपप्राचार्य राजेंद्र पाटील ,पर्यवेक्षक नितीन गवळी , पर्यवेक्षक संजय शिंदे , पर्यवेक्षक सुभाष निकम, कार्यालयीन प्रमुख संजय सूर्यवंशी,परिक्षक श्रीमती एम.बी. शेवाळे, श्रीमती जे.एस. देवरे उपस्थित होते. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते माता सरस्वती, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. सुभाषजी निकम यांच्या हस्ते फीत कापून विज्ञान मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. 
        "अपूर्व विज्ञान मेळावा" या उपक्रमाअंतर्गत विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले . यावेळी विद्यालयाच्या वतीने प्रमुख अतिथी तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.परीक्षक म्हणून श्रीमती एम.बी.शेवाळे व जे.एस.देवरे यांनी कामकाज बघितले.
       प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान प्रदर्शनामुळे निर्माण होत असल्याने अपूर्व विज्ञान मेळावा बाल वैज्ञानिकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे सांगून बाल वैज्ञानिकांनी टाकाऊ वस्तु पासून विविध उपकरणे तयार करून विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतल्याबद्दल बाल वैज्ञानिकांचे कौतुक केले. विज्ञान शिक्षक बी.पी. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य के.डी. दाभाडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन राजेंद्र शेवाळे यांनी केले.अनुमोदन राजेश धनवट तर आभार शशिकांत पवार यांनी मानले.
   अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन विज्ञान छंद मंडळ व विज्ञान विभाग प्रमुख एस.डी. निकम , उपप्रमुख श्रीमती जे.एस. देवरे,बी.पी. सोनवणे, मिलिंद वाघ, सुनील सूर्यवंशी , टी.डी.बोरसे, राजेश धनवट, ए.एम.भालेराव आदी विज्ञान शिक्षकांनी केले. विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट उपकरण सादरीकरण करणारे विद्यार्थी मयूर साळुंखे (प्रथम), प्रसाद पगारे (द्वितीय), उन्मय कांदळकर( तृतीय), लोकेश गांगुर्डे (चतुर्थ), हितेश देशमुख (पाचवा) आणि चेतन पाटीलने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने