के.बी.एच.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा जन्मदिवस तसेच स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कैलास दाभाडे होते.यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक सुभाष निकम, पर्यवेक्षक संजय शिंदे, पर्यवेक्षक नितीन गवळी , कार्यालय प्रमुख संजय सूर्यवंशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज प्राध्यापक विश्वास पगार, जे.एस. बच्छाव ,एस.आर.नेरकर, सौ.आशा पगार, व्याख्याते के.डी.शेवाळे, बी.पी. सोनवणे उपस्थित होते.व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
व्याख्याते जेष्ठ इंग्रजीचे शिक्षक के.डी.शेवाळे यांनी राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या कार्याची माहिती विशद केली तसेच ज्येष्ठ विज्ञान शिक्षक बी.पी.सोनवणे यांनी स्वामी विवेकानंदांच्या कार्याची माहिती दिली.यावेळी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांचे वाचन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कैलास दाभाडे यांनी हिंदवी स्वराज्याच्या जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले (माँसाहेब) व धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक विचारवंत एक तेजस्वी व ध्येयवादी व्यक्तिमत्व दैदिप्यमान रत्न म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती विशद करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वकृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी प्रसाद पवार (प्रथम), प्रतीक लोहार (द्वितीय), जगन्नाथ वाघ (तृतीय )जयश राजपूत उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले परीक्षक म्हणून एन. डी. शिरोळे व एस.डी. महाले यांनी काम बघितले