जम्मू-काश्मीरमधील कुपवारा जिल्ह्यातील माछिल सेक्टर येथे LOC जवळ गस्त घालत असताना भारतीय लष्करातील ३ जवान खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत तिन्ही जवान शहीद झाले. तिघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले आहे
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे हे सैनिक होते. यामध्ये १ ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर आणि २ इतर रँकचे अधिकारी यांची टीम नियमित ऑपरेशनसाठी रवाना झाली होती. मात्र बर्फामुळे अंदाज न आल्याने ते खोल दरीत कोसळले.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्लेशियर कोसळून तीन जवान शहीद झाले होते. ही घटना मच्छिल सेक्टरमध्येच घडली होती. गस्त घालत असताना जवांनावर अचावक हिमनग कोसळला होता. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला होता. तर जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते