देवळा प्रतिनिधि
एस. के. डी. चारिटेबल ट्रस्ट संचलित एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल व व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज भावडे, येथे राजमाता जिजाऊंची व स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली.
जिजाऊंच्या जयंतीनिमित्त विद्यालयाचे कलाशिक्षक राहुल पाटील,नरेंद्र साबळे व विद्यार्थ्यांनी मिळून राजमाता जिजाऊंची तब्बल 15444 स्क्वेअर फुटाची रांगोळी साकारून, राजमाता जिजाऊंना मानवंदना दिली. ही भव्य रांगोळी काढण्यासाठी एकूण सहा दिवसांचा कालावधी लागला असून, चार हजार तीनशे किलो रांगोळीचा उपयोग त्यासाठी करण्यात आला आहे. देवळा तालुक्यात व परिसरात ही रांगोळी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.*कार्यक्रमाप्रसंगी प्रथम राजमाता जिजाऊंची वेशभूषा परिधान करून विद्यार्थिनींची मावळ्यांसोबत रुबाबात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख बैरागी साहेब, माजी केंद्रप्रमुख ब्राह्मणकार सर, ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे, गणेश मोरे, गंगा बापू मोरे, केदा जाधव, सुरेश भदाणे, बाबुलाल बागुल, माणिकराव पगार, शशिकांत भामरे, संजय दिनकर देवरे, संजय जाधव, अशोक सोनवणे, देविदास भामरे व विद्यालयाच्या सेक्रेटरी मीना देवरे मंचावर उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पगुच्छ वाहण्यात आले. तसेच विद्यालयाचे कलाशिक्षक राहुल पाटील व नरेंद्र साबळे यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ ची आरती गाऊन त्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य पाटील एस. एन. वाघ एन. के. सांस्कृतिक विभाग प्रमुख शोभा जाधव, रत्नमाला सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन संजय देवरे यांनी शुभेच्छा दिल्या. बबलू देवरे व कैलास सागर यांचे सहकार्य लाभले. भव्य रांगोळी साठी कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा विभागाचे आभार मानण्यात आले.सदर रांगोळी प्रदर्शन परिसरातील नागरिकांना बघण्यासाठी 14 तारखेपर्यंत खुले असणार आहे
