शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य च्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी महाराणा प्रताप क्रांती दलचे राज्य कार्याध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली . रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी शिवशंभू संघटना नाशिक जिल्हा आयोजित यशवंत गौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांना निवड पत्र नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.तुषार दादा शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले.जितेंद्र सूर्यवंशी हे शिरपूरवडे ग्रा.प चे विद्यमान सदस्य आहेत.सदर निवड ही संस्थापक अध्यक्ष महादेव पवार व राहुल नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.निवड प्रसंगी दिनेश पगारे,गणेश बागुल,आनंद दाणी,रविराज बच्छाव, स्वप्निल आहिरे, सचिन पगारे आदिसह पुरस्कारार्थी उपस्थित होते.
