देवळा (ज्ञानेश्वर आढाव) तालुक्यातील देवपुरपाडे येथील ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना लसीकरण करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. अभिमन बापू अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांच्या लसीकरणाची सुरूवात करण्यात आली. यावेळी जवळपास ५० मुलांचे लसीकरण करण्यात आले.लसीकरणासाठी आरोग्य सेवक डॉ. महेश सुर्यवंशी, वंदना बच्छाव,आशा सेविका रेखा जोंधळे , योगिता बागुल यांच्या देखरेखीखाली लसीकरण करण्यात आले.
लसीकरणावेळी देवपुरपाडे ग्राम पंचायत सदस्य अजय (दादा) अहिरे, चंद्रभान अहिरे, खंडेराव आढाव ,बाळा अहिरे , विनायक अहिरे , सुभाष आढाव,सुरेश निकम, तसेच मुख्याध्यापक वाघ सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी लसीकरण शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.