देवळा | ज्ञानेश्वर आढाव
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून मुलांना शाळेत प्रवेश बंद होता.कारण लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका होता. म्हणून मुलांची शाळा बंद होती.
आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शासनाने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून शाळा भरण्यास परवानगी दिली.
त्यामुळे आज देवपुरपाडे येथील जिल्हा परिषद शाळेत प्रभात फेरी काढून व मुलांना गुलाब पुष्प देऊन मुलांना शाळेत प्रवेश दिला . यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन अहिरे , उपसरपंच शिवाजी अहिरे, बाळासाहेब अहिरे, ज्ञानेश्वर आढाव, ज्ञानेश्वर अहिरे,शरद निकम यांनी मुलांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी संजय मगर सर यांनी मुलांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाजी खैरनार यांनी आभार मानले.